पुस्तके

श्री ज्ञानेश्वर माऊली
महाराष्ट्राच्या संस्कृतिक इतिहासात अत्युच्च स्थान लाभलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे जीवन, कार्य, साहित्य हे सारेच अधबुत् आहे. त्यांचा संक्षिप्त परिचय करून देण्याच्या उद्देशाने या छोट्या ग्रंथाचे लेखन त्यांच्याच प्रेरणेने केले आहे.
संतांचा परिचय हा त्यांच्या नवावरील अवास्तव चमत्कार कथान्पुरता मर्यादित न राहता त्यांच्या श्रेशठ्ताम जीवन मूल्यांचा सत्य परिचय होणे अधिक महत्वाचे आहे, असे लेखकाणा वाटते म्हणून श्री ज्ञानेश्वर चरित्रातील परंपरागत चमत्कार कथानाच प्राधान्य न देता त्यांच्या चरित्राची वासत्व दृष्टीकोनातून मांडणी करण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. अंधश्रद्धा दूर करण्याच्या प्रयत्नात श्रद्धेला तडा जाणार नाही याची दक्षता मात्र लेखकानी घेतली आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाणा आपल्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
या ग्रंथाचे "विनामूल्य" वितरण श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात झाले होते.
छोटी नमूना आवृत्ती पाहण्यासाठी क्लिक करा
पूर्ण पुस्तक पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
-
अमृतधारा - प्रथम
कवी नसतानाही 16 डीसेंबर 1999 रोजी अकल्पित घडले. श्री बाळासाहेबाना एका मागोमाग एक काव्य पंक्ती सूचायला लागल्या आणि त्यानी त्या कागदावर उतरवायला चालू केल्या. अर्थात विषय एकच "भक्तिगीते".
-
अमृतधारा - द्वितीय
कविता आणि काव्य ज्ञानाचा गंध नसतानाही एकाएकी अचानक प्रेरणा होते आणि एका मागोमाग एक काव्य पंक्ती स्फुरु लागतात. या ईश्वरी कृपेच्या अमृत वर्षावातून "अमृतधारा" वाहू लागते.
-
ज्ञानेश्वरीतील अमृत विचारधन
ज्याना समग्र ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या अनमोल विचार धानाच्या भांडारातून ज्या ओव्या सुभाषितान्सारख्या आदर्शवत आहेत, ज्या ओव्यातून जीवन विषयक मार्गदर्शक तत्व आहे, ज्या ओव्यातून धर्मशास्त्र नीतिशास्त्र जीवनशास्त्र अध्यात्मशास्त्र ई. विषयांवरील ज्ञानेशांचे अमूल्य विचार आहेत अशा निवडून त्या सुलभ - सोप्या अर्थासह "ज्ञानेश्वरीतील अमृत विचार धन" या ग्रन्थाद्वारे सादर करण्याचा प्रयत्न केला.
-
प्रभू कृपेचा अमृतानुभव
हे पुस्तक काही माझ समग्र आत्मचरित्र नव्हे, प्रभुकृपेच्या अमृतानुभूतीचे जे क्षण भाग्याने मला जीवनात लाभले, त्या अमृत क्षणांची पार्श्वभूमी सांगताना जे संदर्भ आवश्यक वाटले ते तेवढे नमूद केले आहेत...